काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते,
इज थयथय नाचते, धग ढोल वाजविते
तिफन चालते
नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हकालते
वटी बांधून पोटाले पारावती उनारते
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते
त्यात तानुलं लळते ढग बरसते
तिफन चालते
काकरात बीजवाई जसं हासरं चांदनं
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते
भूल जीवाले पाळते वाट सांजीले पाह्यते
मैना वाटुली पाह्यते राघू तिफन हानते
राघू तिफन हानते ढग बरसते
तिफन चालते
वला टाकती तिफन शीतू वखर पाह्यते
पानी भिजलं ढेकुल लोनी पायाले वाटते
काया ढेकलात डोया हिरवं सपन पाह्यते
डोया सपन पाह्यते काटा पायात रुतते
काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरवं सपन फूलते
हिरवं सपन फूलते ढग बरसते
तिफन चालते
- विठ्ठल वाघ
Tuesday, 25 November 2008
तिफन
Wednesday, 19 November 2008
प्रेम
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं
शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
- कुसुमाग्रज
संदर्भ :- अकरावी मधे संस्कृत शिकवणारं कॉलेज मधे कोणी नसल्याने ऐच्छिक विषय म्हणुन मराठी घ्यावं लागलं त्याचा एकमेव फायदा म्हणजे ही कविता. पण एकदम चाबुक आहे ही, हो ना? "प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं " वाह वाह, hats off to कुसुमाग्रज!

फुलराणी
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती
गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला ।
पूरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला चुंबुन म्हणे फुलराणीला
छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती
कोण बरे त्या संध्येतुन हळूच पाहते डोकावून
तो रवीकर का गोजिरवाणा आवडला आमुच्या राणींना
लाजलाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी ।
स्वर्भुमीचा जुळवीत हात नाच नाचतो प्रभातवात
खेळुनी दमल्या त्या ग्रहमाला हळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती मंद मंद ये अवनीवरती
विरु लागले संशय-जाल संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी हर्ष निर्भरा नटली अवनी
स्वप्न संगमी रंगत होती तरीही अजुनी फुलराणी ती ।
तेजोमय नव मंडप केला लक्ख पांढरा दहा दिशाला
जिकडे तिकडे उधळीत मोती दिव्य वर्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबी फेटा झकमकणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला हा वाड़निश्चय करावयाला
हे थाटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे ।
गावू लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट
वाजवी सनई मारुतराणा कोकीळ घे तानावर ताना
नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रवीकर नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागले सावध सारे सावध पक्षी सावध वारे
दवमय हा अंतःपाट फ़िटला भेटे रवीकर फ़ुलराणीला ।
- बालकवी (त्र्यं बा ठोंबरे)
संदर्भ :- दहावी च्या पुस्तका मधली ही नितांतसुंदर कविता (तसं आमच्या course चं सगळच content झक्कास होतं अगदी). सहसा कुठल्याच कविता पाठ व्हायच्या नाहीत, पण ही मात्र सहज डोक्यात, मनात, हृदयात जी जाउन बसली ती कायमची. अजुनही एखादं कडवं सहज तोंडावर येतं. ही कविता शिकवणारया ठोंबरे मॅड्म ना शतशः धन्यवाद. दुसरया कडव्यातील "चुंबुन" च्या वेळेचं अक्ख्या वर्गा मधलं टेंशन अजुनही विशेष आठवतं.

Tuesday, 18 November 2008
अजून काही
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही
जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही
तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या ?
सणाणती बंडखोर वारे अजून काही
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही
- सुरेश भट

Friday, 14 November 2008
गणपत वाणी
गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी,
म्हणायचा अन् मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी !
मिचकावुनी मग उजवा डोळा आणी उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई !
गिर्र्हाइकाची कदर राखणे; जिरे, धणे अन् धान्ये गळित,
खोबरेल अन् तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत !
स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा,
मिणमिण जळत्या; आणी लेटणे वाचीत गाथा श्रीतुक्याची !
गोणपटावर विटकररंगी सतरंजी अन् उशास पोते,
आडोशाला वास तुपाचा; असे झोपणे माहित होते !
काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐसी केली,
दुकानातल्या जमीनीस ती सदैव रुतली आणिक रुतली !
काड्या गणपत वाण्याने ज्या चावुनी चावुनी फेकून दिधल्या,
दुकानातल्या जमीनीस त्या सदैव रुतल्या आणिक रुतल्या !
गणपत वाणी विडी बापडा पितापितांना मरुन गेला,
एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला !
- बा सी मर्ढेकर
संदर्भ :- ही कविता पाठ्य पुस्तकात नव्हती कदाचित, पण कुठल्याशा अलंकाराचे (स्वभावोक्ती?) उदाहरण म्हणुन व्याकरणात होती. का आवडते...? Because it's just sooooooooooooo lovable!

Thursday, 13 November 2008
अनाम वीरा
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त,
स्तंभ तिथे ना कोणी बांधला, पेटली ना वात!
धगधगता समराच्या ज्वाला या देशा काशी
जळावयास्तव संसारातुनी उठोनिया जाशी!
मुकपणाने तमी लोपती संध्येच्या रेशा
मरणामधे विलीन होशी ना भय ना आशा!
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
- कुसुमाग्रज
संदर्भ :- 'सा रे ग म प Little Champs' मधल्या आर्या आंबेकर नी हे गाणं त्यादिवशी सादर केलं अन तेव्हापासून playlist वरुन हलायला तयारच नाही. कुसुमाग्रजांच्या सगळ्याच कविता तशा भन्नाट, पण ही ख़रच वेड लावणारी आहे.

Subscribe to:
Comments (Atom)